![]() |
|
---|---|
साधारणपणे कॉम्प्युटरमधिल
स्टार्ट मधिल प्रोग्रॅम्स विभागातील आपणास नको असलेल्या
प्रोग्रॅम/सॉफ्टवेअरच्या जागेमध्येच "Uninstall" ची म्हणजेच तो प्रोग्रॅम
काढण्याची सोय असते. एखादा प्रोग्रॅम "Uninstall" करणे म्हणजे तो
प्रोग्रॅम काढून टाकणे होय. एखाद्या प्रोग्रॅमच्या जागेतील "Uninstall"
बटणावर क्लिक करुन आपण तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट करु
शकता. पण काही वेळेस काही प्रोग्रॅमच्या जागेमध्ये "Uninstall" हे बटण
नसते मग अशावेळेस विंडोजमध्ये कुठलाही प्रोग्रॅम काढण्याची निराळी सोय
असते.
आपणास नको असलेल्या एखाद्या
प्रोग्रॅमच्या ठिकाणी तो प्रोग्रॅम काढण्यासाठी "Uninstall" ची सोय नसेल
तर तो प्रोग्रॅम काढण्यासाठी क्रिया खाली दिली आहे.
१. Start > Settings > मधिल Control Panel विभाग सुरु करा.
![]() २. आता त्यातील 'Add or Remove Programs' म्हणजेच आयकॉनवर डबलक्लिक करा. ![]() ३. आता आपल्यासमोर 'Add or Remove Programs' चा चौकोन उघडेल, आपणास नको असलेल्या म्हणजेच काढावयाच्या प्रोग्रॅमवर क्लिक करुन त्याच्या बाजूच्या 'Remove' या बटणावर क्लिक करा. ![]() अशाप्रकारे तो प्रोग्रॅम काढताना येणार्या विंडो मध्ये पुढे Next, Next, Finish अशा बटणांवर क्लिक करुन शेवटी तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट होतो. |
COMPUTER KNOWLEDGE
Sunday, 28 September 2014
10. कॉम्प्युटरमधून एखादा प्रोग्रॅम कसा काढायचा?
9. काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट
![]() |
|
---|---|
१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता. २. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा. ३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता. ४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता. ५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता. ६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे. ७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल. ८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो. ९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते. १०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे. ११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे. १२. www.bugmenot.com - बर्याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते. १३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा. |
8.कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स

सर्वसामान्य शॉर्टकट्स |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
7. चॅटींग म्हणजे काय व चॅटींग कशी करावी
![]() |
|
---|---|
इतरांशी केलेल्या गप्पांगोष्टींना चॅटींग अथवा चॅट म्हटले जाते. इंटरनेटद्वारे कॉम्प्युटरवरुन केलेली चॅटींग हा त्यातलाच एक प्रकार. पण इथे दोन व्यक्ती समोरासमोर गप्पांगोष्टी न कराता जगभरातून कुठूनही गप्पांगोष्टी करु शकतात. या चॅटींगची महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा खर्च वगळता या चॅटींगला इतर कुठलाही अधिक खर्च येत नाही, थोडक्यात ही सेवा मोफत आहे. चॅटींगसाठी असलेल्या प्रोग्रामला ' मॅसेंजर ( Messanger ) ' असे म्हणतात. सध्या बर्याच वेबसाईट वरुन चॅटींगसाठी करण्यासाठी प्रोग्राम मोफत दिला जातो. त्यातील याहू, हॉटमेल, रिडिफ आणि जी-मेल यांचे ' मॅसेंजर ' जास्त प्रसिद्ध आहेत. सहाजिकच या वेबसाईटवरील मॅसेंजर वापरताना आपण त्यांचे सभासद असणे आवश्यक असते आणि त्यांची मेंबरशीप म्हणजेच सभासदसेवा देखिल मोफत आहे हे तुम्हाला माहित असेलच. जसे तुम्हाला जर एखाद्याला फोन करायचा असेल तर दोन गोष्टी आवश्यक आहेत त्या म्हणजे तुम्हा दोघांकडे फोन असणे आणि तुम्हाला दुसर्याचा फोन नंबर माहित असणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे कॉम्प्युटरवरुन चॅटींग करण्यासाठी देखिल काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे. १) दोघांकडे कॉम्प्युटरवर इंटरनेट असणे २) दोघांकडे एकाच प्रकारचा चॅटींगचा प्रोग्राम म्हणजे मॅसेंजर असणे ३) ज्या प्रकारचा मॅसेंजर तुमच्याकडे असेल त्या वेबसाईटची तुमची मेंबरशीप असणे म्हणजेच त्यांचा ई-मेल असणे आवश्यक आहे. जसे तुम्ही जर याहू चा मॅसेंजर वापरत असाल तर तुमचा याहूचा ई-मेल असणे आवश्यक आहे ४) तसेच दोघांनाही एकमेकांचा ई-मेल पत्ता माहित असणे आवश्यक आहे. |
6. शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?
![]() |
|
---|---|
कॉम्प्युटरमध्ये आपल्या सर्व फाईल्स निरनिराळ्या फोल्डर्समध्ये ठेवलेल्या असतात. तसेच आपल्या फाईल्स व्यवस्थित रहाव्यात व लवकर मिळाव्यात म्हणून आपण त्या निरनिराळ्या फोल्डर्समध्ये आणि कॉम्प्युटरमधल्या निरनिराळ्या ड्राईव्ह मध्ये ठेवतो. उदा. (C:) , (D:) , (E:) इ. मग एखादी फाईल आपणास उघडायची असल्यास आपण ती फाईल जेथे ठेवलेली असेल तेथे जावून त्यावर डबल क्लिक ( Double Click ) करुन ती फाईल उघडतो. बर्याच वेळा आपणास हवी असलेली आवश्यक फाईल आपण कुठे ठेवली आहे ते आठवत नाही आणि शोधण्यात विनाकारण वेळ वाया जातो. हा वेळ वाचविण्यासाठी त्या फाईलची शॉर्टकट जर डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) ठेवली तर नेहमी ती फाईल उघडण्यासाठी शोधाशोध करण्यापेक्षा त्या शॉर्टकटवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास ती फाईल लगेच सापडेल व उघडली जाईल. ![]() १ ) आपणास ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीथे जा. २) ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीला माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करा. ३) आता बाजूला येणार्या चौकोनातील ' Send To ' विभागातील ' Desktop (create shortcut) ' वर क्लिक करा. ![]() तसेच ५ ) त्याच चौकोनातील ' Create Shortcut ' वर क्लिक केल्यास त्या फाईलची शॉर्टकट तिथेच तयार होईल मग ती शॉर्टकटची फाईल तूम्ही जीथे न्याल तेथून ती मूळ फाईल उघडता येईल. ![]() टिप : लक्ष्यात असू द्या की शॉर्टकटची फाईल ही खरंतर मुख्य फाईल उघडण्याची सोय असते, या शॉर्टकट फाईलवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास मुख्य फाईल उघडते. तुम्ही फाईलमध्ये केलेले सर्व बदल मुख्य फाईल होतात, म्हणून जर एखाद्याला/दुसरीकडे जर ही फाईल द्यायची असेल तर शॉर्टकट फाईल देवू नका, त्यांच्याकडे ती उघडणार नाही. कारण तुम्ही केलेली शॉर्टकट फाईल ही फक्त शॉर्टकट बनविलेल्याच कॉम्प्युटरवरच चालेल. |
5. सीडी राईट कशी करावी?
![]() |
|
---|---|
सीडी राईट कशी करावी, म्हणजेच आपल्या कॉम्पुटरमधिल माहिती सीडीवर कशी साठवावी. तुमच्या कॉम्पुटरवर तुम्ही सीडीवरील गाणी, पिक्चर पाहू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये सीडी राईट देखिल करु शकता, सीडी राईट करण्यासाठी सीडी ड्राईव्हर हा सीडी राईटर असायला हवा. शक्ततो त्या सीडी ड्राईव्हरवर 'Recorder/Re-Writable/Writer' असे लिहिलेल असल्यास तुम्ही त्यावर सीडी राईट करु शकता. विंडोज मध्ये सीडी राईट करण्यासाठी स्वतःचा सीडी राईटींचा प्रोग्राम आहे, परंतू त्यामध्ये काही आवश्यक गोष्टी नसल्यामूळे सीडी राईट करण्यासाठी 'Nero' हा स्वतंत्र प्रोग्राम जास्त प्रसिद्ध झाला. जास्तीत जास्त ठिकाणी 'Nero' हाच प्रोग्राम सीडी राईट करण्यासाठी वापरला जात असल्याने आपणदेखिल तोच प्रोग्राम कसा वापरायचा ते पहाणार आहोत. टिप : 'Nero' या एकाच प्रोग्राममध्ये सीडी राईट केल्यास ती सीडी इतर ठिकाणी दुसर्या कॉम्पुटरवर देखिल 'Nero' या प्रोग्रामद्वारे पून्हा-पून्हा ती सीडी राईट करु शकता. ![]() ![]() १. आपणास जर कॉम्पुटरमधिल एखादी माहिती अथवा एखादी फाईल सीडीवर राईट करायची असेल तर त्या चौकोनातील वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Data' या विभागावर माऊस न्या आणि त्याच विभागातील 'Make Data CD' या उपविभागावर क्लिक करा. ![]() २. आता पुढील चौकोनात वर उजव्या बाजूला 'Add' असे बटण दिसेल. सीडी मध्ये ज्या फाईल्स राईट करायच्या आहेत त्या निवडण्यासाठी इथे क्लिक करा. ![]() ३. 'Add' या बटणावर क्लिक करताच 'Select Files and Folders' असा एक छोटा चौकोन समोर येईल. त्यामध्ये आपणास हव्या असलेल्या फोल्डर मधून आपणास हव्या असलेल्या फाईल्स निवडाव्या व खालिल 'Add' व नंतर 'Finished' ह्या बटणावर क्लिक करावे. ![]() ४. आता मगाचचाच चौकोन आपल्या समोर येईल ज्यामध्ये आपण निवडलेल्या फाईल्स असतील, तसेच त्या सर्व फाईल्सना एकुण किती जागा लागली आहे हे देखिल त्याच चौकोनात दिलेले असेल. आता पूढे जाण्यासाठी 'Next >' ह्या बटणावर क्लिक करा. ![]() ५. आता या पुढिल चौकोनात * तुम्हाला त्या सीडीला काय नाव 'Disc name' द्यायचे आहे?, * ती किती स्पिडला 'Writing Speed' राईट करायची आहे? (शक्यतो हा स्पिड '16x (2,400KB/s)' द्यावा, जेणे करुन ती सीडी सर्व कॉम्प्युटर्सवर चालेल.), * तसेच 'Allow files to be added later (multisession disc)' म्हणजेच ती सीडी पून्हा-पून्हा राईट करुन वापरायची असल्यास त्या पुढील चौकोनावर क्लिक करावे. या सर्व गोष्टी दिल्यानंतर खालिल ' Burn ' ह्या बटणावर क्लिक करावे. ![]() ६. आता आपल्यासमोर सीडी राईट करण्याची प्रक्रिया सुरु होईल. ![]() ७. सीडी पूर्ण राईट होताच आपल्यासमोर ' Burn process completed successfully at 16x (2,400 KB/s) ' असा संदेश येईल, तीथे ' OK ' वर क्लिक करा. बस्स असे करताच आपली सीडी राईट होवून आपोआप बाहेर येईल. ![]() ८. आता इथे पुन्हा एकदा तोच चौकोन येईल त्यावरील ' Next ' ह्या बटणावर क्लिक करा. ![]() ९. आता या शेवटच्या चौकोनामध्ये कॉम्पुटर आपणास ' Exit ' असे विचारेल त्यावर क्लिक करा आणि तो प्रोग्राम बंद करा. ![]() |
4. फोटोशॉप ७ ओळख
![]() |
|
---|---|
![]() |
|
निरनिराळे
सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे
आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी
सॉफ्टवेअर्स असले तरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही फोटोशॉप
सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते. फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स आहेत. फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात. जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच कृष्णधवल फोटोला रंगीत करायचे असेल, एखाद्या फोटोमधिल मागील चित्र बदलायचे असल्यास, एखाद्या जुन्या खराब झालेल्या फोटोला चांगले करायचे असल्यास, दोन निरनिराळ्या चित्रांना एक करायचे असल्यास, सरळ अक्षरांना वेड्यावाकड्या निरनिराळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी. इतकेच नाही तर संपुर्ण फोटो एवजी त्या फोटोमधिल एखाद्याच ठिकाणी बदल करायचा असला तरी फोटोशॉपमध्ये ते शक्य होते, जसे एखाद्या फोटोमधिल एखादी व्यक्ती काढून तीला दुसर्याच फोटोमध्ये निराळ्याच लोकांबरोबर दाखवायचे असेल, एखाद्या फोटोमधिल एखाद्या व्यक्तीचा कपड्यांचा रंग बदलायचा असेल. अशा बर्याच गमतीदार बदल करण्याची सोय फोटोशॉपमध्ये असल्याने फोटोशॉप बर्याच लोकांचे आवडते सॉफ्टवेअर बनले आहे. टीप: सध्या फोटोशॉप CS 3 जरी वापरले जात असले तरी आजही बर्याच ठिकाणी फोटोशॉप ७ वापरले जाते, म्हणून येथे फोटोशॉप ७ मध्ये वापरता येतील असे इफेक्टस दिले आहेत. असे असले तरी हे सर्व इफेक्टस फोटोशॉपच्या नविन प्रकारामध्ये देखिल वापरता येतील. |
Subscribe to:
Posts (Atom)