Sunday, 28 September 2014

10. कॉम्प्युटरमधून एखादा प्रोग्रॅम कसा काढायचा?

  कॉम्प्युटरमधून एखादा प्रोग्रॅम कसा काढायचा?
 
साधारणपणे कॉम्प्युटरमधिल स्टार्ट मधिल प्रोग्रॅम्स विभागातील आपणास नको असलेल्या प्रोग्रॅम/सॉफ्टवेअरच्या जागेमध्येच "Uninstall"  ची म्हणजेच तो प्रोग्रॅम काढण्याची सोय असते. एखादा प्रोग्रॅम "Uninstall"  करणे म्हणजे तो प्रोग्रॅम काढून टाकणे होय.  एखाद्या प्रोग्रॅमच्या जागेतील "Uninstall"  बटणावर क्लिक करुन आपण तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट करु शकता. पण काही वेळेस काही प्रोग्रॅमच्या जागेमध्ये "Uninstall"  हे बटण नसते मग अशावेळेस विंडोजमध्ये कुठलाही प्रोग्रॅम काढण्याची निराळी सोय असते.
आपणास नको असलेल्या एखाद्या प्रोग्रॅमच्या ठिकाणी तो प्रोग्रॅम काढण्यासाठी "Uninstall"  ची सोय नसेल तर तो प्रोग्रॅम काढण्यासाठी क्रिया खाली दिली आहे.

१. Start > Settings >  मधिल  Control Panel  विभाग सुरु करा.

२. आता त्यातील 'Add or Remove Programs'  म्हणजेच आयकॉनवर डबलक्लिक करा.

३. आता आपल्यासमोर 'Add or Remove Programs' चा चौकोन उघडेल, आपणास नको असलेल्या म्हणजेच काढावयाच्या प्रोग्रॅमवर क्लिक करुन त्याच्या बाजूच्या 'Remove'  या बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे तो प्रोग्रॅम काढताना येणार्‍या विंडो मध्ये पुढे Next, Next, Finish  अशा बटणांवर क्लिक करुन शेवटी तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट होतो.

No comments:

Post a Comment