![]() |
|
---|---|
![]() |
|
खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण दिले आहे. ![]() २. Quick Launch - क्विक लॉन्च :- या मध्ये काही महत्वाचे प्रोग्राम लोड करतान आपोआप जमा होतात वर दिलेल्या स्टार्ट मेनू मधिल प्रोग्राम विभागातून एखादा प्रोग्राम सुरु करण्याएवजी या क्विक लॉन्च म्हणजेच 'पटकन सुरु' या विभागातून देखिल तो प्रोग्राम सुरु करता येतो. तुम्हाला हव्या असलेल्या एखाद्या प्रोग्रामच्या आयकॉनला पकडून जरी या क्विक लॉन्च विभागात आणले तरी पटकन त्याची या विभागात शॉर्टकट तयार होते व पुढच्यावेळी या विभागातील त्या आयकॉनवर क्लिक करुन तो प्रोग्राम सुरु करता येतो. ३. Active Programs - चालू प्रोग्राम्स :- या मध्ये आपण जे जे प्रोग्राम्स चालू केले असतील त्याची नावे दिसतात. म्हणजेच एखादा प्रोग्राम सुरु करण्याआधी तो प्रोग्राम आपण आधीच सुरु केलेला असेल तर येथे त्याचे नाव दिसते. ४. Task Bar - प्रोग्राम्स बार :- या जागेमध्ये जे जे प्रोग्राम्स आपण सुरु कराल त्याचे नाव दिसते. ५. Notification Area - नोटीफीकेश एरीया :- या जागेला ' System Tray ' असेही म्हणतात. या विभागामध्ये आपण काहीच बदल करु शकत नाही. विंडोज सुरु होतानाच काही सॉफ्टवेअर्स सुरुवातीलच आपोआप सुरु होतात (उद. मॅसेंजर, अँटी-व्हायरस ई. सॉफ्टवेअर्स) हे सॉफ्टवेअर्स महत्त्वाचे असल्याने विंडोज सुरु होतानाच ते देखिल आपोआप सुरु होतात. याच विभागामध्ये चालू दिनांक आणि वेळ दाखविली जाते ती जर बदलायची असल्यास अथवा चुकीची असल्यास बदलण्यासाठी त्यावर ' डबल क्लिक ( Double Click ) ' करावे त्यामूळे येणार्या चौकोनामध्ये दिनांक आणि वेळ बदलण्याची सोय असते. ६. Desktop Icons - डेस्कटॉपवरील आयकॉन :- या चित्रांना ' आयकॉन ' असे म्हणतात. त्यामध्ये 'My Documents', 'My Computer', 'My Network Places', 'Recycle Bin', हे प्रमुख चार आयकॉन सर्वच कॉम्प्युटरवर आढळतात. तर इतर आयकॉन हे सॉफ्टवेअर लोड करताना तर काही आपण तयार केलेल्या फाईलींचे आयकॉन असतात. ७. Desktop - डेस्कटॉप :- या जागेस डेस्कटॉप म्हणजेच विंडोजची जागा असे म्हणतात. या जागेस विंडोजचे सुरवातीचे पान असे देखिल म्हटले जाते. |
Sunday, 28 September 2014
3. विंडोजची ओळख
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment